जर्मनीमधुन – भाग-२

जर्मन नागरिक हा वरवर मख्ख चेहऱ्याने वावरत असला तरी त्याच्यामधे शांतपणे ऐकुन घेण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीशी शांतपणे संवाद करण्याची एक प्रवृत्ती आहे, (ती कधीपासून आहे आणि त्याची कारणे काय आहेत ह्याविषयी पक्के मला सांगता येणार नाही) ते भारतीयांसारखे रूढार्थाने आवाजी किंवा लाऊड नसतात पण म्हणुन ते आनंदी नसतात असं नाही. ते रेल्वेत, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी फार मोठ्यांनी बोलणार नाहीत अथवा काही वेळाच मोठ्यानं बोलतील, पण ह्याचा अर्थ ते आयुष्याची मजा घेत नाहीत असा होत नाही. कुठल्याही गोष्टीवर समजुन उमजुन बोलायची त्यांची वृत्ती नक्कीच वाखाण्यासारखी आहे.

खुप लोक मोठ्यांदि बोलतात, जोरजोरात भांडतात, रस्त्यावर उतरून नाचतात म्हणजे ते कायम आनंदी आणि सुखी असतात असं नाही. कदाचित, शांततेमधला श्वास त्यांना सापडलेला नसतो, असं म्हणता येईल. काहीतरी पटकन करण्याची प्रवृत्ती सोडणं, मोठ्या ध्येयाचा घास घेण्याआधी , एक हजार छोट्या गोष्टी तडीस नेणं, प्रत्येक पायरीवर स्वतःला प्रश्न विचारणे म्हणजे खऱ्या अर्थानं जर्मन भाषा आणि संस्कृती अंगिकारणे होय.

परप्रांतामधुन, दुसऱ्या देशांमधुन आलेल्या लोकांनी सुद्धा जर्मनी मध्ये हे गुण अंगिकारले तर त्यांना जर्मनांकडुन अव्हेरल्यासारखं वाटण्याची शक्यता कमी आहे.

अर्थात, म्हणुन अशी लोकं आम्हाला नकोत किंवा त्यांना एका भागापुरते मर्यादित ठेऊन आणि शिक्षण देऊन, त्यांना आपल्या संस्कृतीचा भाग बनवता येईल हा भाबडा विश्वास सुद्द्धा मारकच आहे.

म्हणजे महारांसाठी स्वतंत्र मंदिर बांधले कि ते समस्त हिंदु धर्माचा भाग होतील आणि हिंदु एक होईल असं काहीसं म्हणण्यासारखे आहे.

हे आदानप्रदान प्रचंड अवघड आहे आणि प्रत्येक क्षणाला ह्यासाठी आणि ह्यामध्ये राजकारण आहे, जागतिक दडपण आहे, विविध मतप्रवाह आहेत, पण त्यांना शांतपणे भिडल्यावाचून आत्तातरी दुसरा कुठलाच मार्ग जर्मनी समोर दिसत नाहीये.

आमचं आणि तुमचं करत बसण्यापेक्षा “आपलं एकत्र काहीतरी”, असा विश्वास संपादन करायला काही वर्षे जावी लागतील आणि जर्मनी त्यात नक्कीच यशस्वी होईल हा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.

शास्त्रीय दृष्टिकोन, खोलवर, मुळाशी जायची प्रवृत्ती आणि नाविन्याचा ध्यासच माणसाला विनाशापासुन वाचवतो आणि बाकी जगाशी जोडतो आणि जे समोर दिसतं आहे , जाणवतं आहे त्याचा गर्भितार्थ काढायला मदत करतो हा इतिहास आहे आणि हा इतिहास कुठलाही धर्म अथवा पंथ मिटवु शकत नाही.

दोन वर्षांपूर्वी लिहिलेलं, हे परत , भाग १ म्हणुन बघताना, जर्मनी मधे बरेच बदल झाले आहेत. चायना, जर्मनी बरोबर एक महत्वाचा पार्टनर म्हणुन काम करतो आहे. कडव्या विचारांची एक संघटना मोठी होते आहे. त्यांचे ९८ खासदार संसदेत आहेत. फुटकळ कारणावरून सुरू झालेली भांडणे, वांशिक हिंसेच्या घटनांमध्ये परावर्तित होताहेत. आपले आणि परके ही भावना एकदे हळूहळू जोर धरू लागते आहे. इस्लाम विना शाळा , अश्या प्रकारच्या जाहिराती दिसु लागल्या आहेत.

जर्मनी कडे एक विशेष शक्ती आहे. आपल्या आठवणी जाग्या ठेवायच्या आणि त्यामधून नुसते धडे घ्यायचे नाहीत तर आपण सतत काहीतरी केलं पाहिजे असा विश्वास सारखा त्या देत राहिल्या पाहिजेत. असं करणे म्हणजेच विविध इंस्टॉलेशन ठिकठिकाणी लावणे. त्यासाठी त्या संपूर्ण भागात विविध पूरक कामे करणे. सायकल ट्रॅक त्या ठिकाणांच्या जागी तयार करणे. जवळपास रेल्वे चे जाळे तयार करणे.

- धनेश जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

डुईसबुर्ग जर्मन लॅंग्वेज कोर्स

काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट टाकली होती. त्यात मी उल्लेख केला होता तो आमच्या डुईसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स साठी आम्ही गेली ३ वर्षे जर्मन नाटक

Read More »

डुइसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स, सप्टेंबर २०१८

२०१७ साली, आम्ही पहिल्यांदा कोर्स मधील मुलांना घेऊन जर्मन नाटक बसवले. कोर्स मधल्याच मुलांनी लिहिलेलं. आणि तो प्रयोग खूपच वाखाणला गेला. त्या प्रयोगाविषयी मी लिहिले

Read More »